
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातून कर्नाटकात जाणारा सगळ्यात लगतचा मार्ग म्हणजे दोडामार्ग तिराली बेळगाव राज्य मार्ग. मात्र तिलारी घाट अखेरची घटका मोजत असल्याचे चित्र सोशल मीडिया वर उभे करण्यात आले होते त्यानंतर येथून एसटीची बस वाहतूक बंद केली. ही वाहतूक सुरू व्हावी यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले. त्याला बांधकाम विभाग तसेच एसटी विभागाने केराची टोपली दाखवली होती. त्यानंतर घाट दुरुस्ती आवश्यक्यता आहे असे सांगितले. शेवटी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे घाट दुरुस्तीचे काम सुरू केले मात्र हे काम करत असताना जी लहान वाहने या घाटातून ये- जा करत होती त्यांना सदरचा घाट हा पूर्णतः बंद करण्यात आला, यामुळे लोकांची मोठी गैरसोय होत असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आपल्या पदाधिकाऱ्यां सोबत पाहणी करून सदर घाटाची दुरुस्ती करताना लहान वाहनांना अडथळा करू नका ती वाहतूक सुरु ठेवा असे ठेकेदाराला धुरींनी सुनावले.
गेले कित्येक महिने तिराली घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. घाटातील सौरक्षक कठडे दुरुस्ती करण्यासाठी तिलारी घाट सर्वच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. उद्धव बाळासाहेबाब ठाकरेचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांच्या कानावर आले. त्यांनी काल तालुकाप्रमुख संजय गवस यांसह आपल्या इतर पदाधिकाऱ्यांना घेऊन तिलारी घाटात जात वस्तुस्थितीची पाहणी केली, या घाटातून राजरोसपणे कोंबड्याच्या गाड्या फिरतात. मात्र इतर वाहनांना हा घाट बंद का असा सवाल करत, तुम्ही तुमचे काम करत राहा मात्र इतरांना त्रास न देता इथून लहान वाहनांची वाहतूक सुरूच ठेवा, या घाट रस्त्याच्या दुरुस्ती कामामुळे सामान्य लोकांची परवड होऊ देऊ नका, या घाट रस्त्यातून रुग्ण तसेच अनेक व्यपारी आणी सामान्य लोकही येजा करतात त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये,असे सुनावत सदरचा घाट रस्ता हा लहान वाहनांसाठी सुरू केला.
बाबुराव धुरी हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की सदरचा घाट १९ फेब्रुवारीपासून लहान वाहनांसाठी सुरू करण्यात आला आहे, यातून अवजड वाहने धावणार नाहीत तशी दक्षता विजघर सीमेवरती तसेच चंदगड पोलिसांना ही देण्यात आलेले आहे. त्यामुळे लहान वाहने असणारे वाहतूकदार या घाटातून हे ये-जा करू शकतात.
यावेळी त्यांच्या समवेत तालुका प्रमुख संजय गवस, मदन राणे (युवासेना तालुकाप्रमुख , संदेश राणे(शिवसेना सोशल मीडिया प्रमुख), विजय जाधव(विभाग प्रमुख ), लक्ष्मण आयनोडकर(विभाग प्रमुख ), शुभंकर देसाई, सिद्धू कासार, दशरथ मोरजकर, भिवा गवस, राजू गावडे, संदेश वरक आदी उपस्थित होते.