तिलारी एम्युझमेंट पार्कबाबत वेधलं लक्ष

Edited by: लवू परब
Published on: December 28, 2024 13:10 PM
views 236  views

दोडामार्ग : तिलारी येथे आंतरराष्ट्रीय धरण प्रकल्प आहे. शिवाय इथल्या शेकडो युवक युवतींची 'तिलारी रोजगार पर्यटन विकास एकता मंच'च्या माध्यमातून तिलारी डेव्हलप करा अशी मागणी आहे. नुकतीच तिलारीत अम्युझमेंट पार्कसाठी निविदा प्रसिद्ध झाली. याबाबत लोकप्रतिनिधीनी लक्ष घालावे यासाठी भाजपा युवामोर्चा दोडामार्ग अध्यक्ष पराशर सावंत आणि युवकांनी मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, आमदार दिपक केसरकर यांची घेतली भेट घेतली.

   कुडाळ येथे कार्यक्रमास मंत्री राणे आणि आमदार केसरकर हे एकत्र आहेत हे लक्षात घेऊन तिलारी खोऱ्यातील युवकांनी भेटीचे नियोजन केले. माजी शिक्षण मंत्री आणि सध्याचे स्थानिक आमदार दिपक केसरकर हे तिलारीत तिलारीत अम्युझमेंट पार्क व्हावा यासाठी गेली काही वर्षे प्रयत्न करत आहेत. 'तिलारी रोजगार पर्यटन विकास एकता मंच' च्या माध्यमातून 'तिलारी डेव्हलप करा, आम्हाला रोजगार द्या' या टॅगलाईन खाली युवक युवती एकत्र आले आहेत यांच्या मागणीला बळ मिळावे म्हणून या भागातील स्थानिक प्रतिनिधी कोनाळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि भाजपा युवामोर्चा दोडामार्ग अध्यक्ष पराशर सावंत, यांनी मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. राणे, आमदार श्री. केसरकर यांची भेट घेतली. नुकतीच तिलारीत अम्युझमेंट पार्कसाठी निविदा प्रसिद्ध झाली या पार्शवभूमीवर ही भेट होती यावेळी मंत्री ना. राणे, आमदार श्री. केसरकर यांना निवेदनही देण्यात आले. यावेळी दोघांनीही 'काळजी करू नका, तिलारीत रोजगार आणू' असा शब्द दिला.