
वेंगुर्ला : भाजपच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. त्याचा फायदा करून पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या योजना तळागाळात पोहोचण्यासाठी आपले प्रयत्न सुरू राहतील. पुढील काळात खासदार नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यात वेगवेगळे उपक्रम घेतले जातील. मी एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून जनसामान्यांसाठी काम करत आहे आणि यापुढे ही करणार आहे, असा विश्वास भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी वेंगुर्ले येथे व्यक्त केला.
विशाल परब यांच्या माध्यमातून आज वेंगुर्ले बाजारपेठेत ग्रामीण भागातून येणाऱ्या छोट्या भाजी, ग्रामीण भागातील इतर वस्तू विक्रेत्यांना पावसापासून बचावासाठी छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजप उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, ॲड.अनिल निरवडेकर, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, मनवेल फर्नांडिस, पप्पू परब, सुहास गवंडळकर, प्रशांत खानोलकर, साईप्रसाद नाईक, भूषण आंगचेकर, प्रणव वायंगणकर, सत्यविजय गावडे, वसंत तांडेल, दादा केळुसकर, शेखर काणेकर, हितेश धुरी, सुरेंद्र चव्हाण, हेमंत गावडे, अभिषेक वेंगुर्लेकर, प्रीतम सावंत प्रभाकर गावडे, सचिन गावडे, संदेश गावडे, वैभव होडावडेकर, साईप्रसाद भोई, प्रफुल्ल प्रभू, श्रीकांत राजाध्यक्ष, प्रसाद नाईक, नारायण कुंभार, सत्यवान पालव, अजित कणयाळकर, व्यापारी, स्थानिक ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते