
सावंतवाडी : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधूनअभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग तफेँ शिवकालीन युद्धकलेच्या सादरीकरणाचा जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राजघराण्याच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्याहस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, डॉ. प्रसाद नार्वेकर, किशोर चिटणीस, राजू केळुसकर, अण्णा म्हापसेकर आदी उपस्थित होते.
शिवकालीन परंपरेचा वारसा जपत, नवीन पिढीला शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण मिळावे या हेतूने अभिनवनं गेले दहा दिवस कळसुलकर इंग्लिश स्कूल येथे या प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. यात विविध वयोगटातील मुलामुलींनी भाग घेतला व प्रशिक्षण प्राप्त केले. या विद्यार्थ्यांना फिरंगोजी शिंदे आखाडा,कोल्हापुर यांनी प्रशिक्षण दिले. या युद्धकलेच्या प्रात्यक्षिक सादरीकरणाचा जाहीर कार्यक्रम १ मे रोजी जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान येथे सादर करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी, अभिनव फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.