
सावंतवाडी : टीम शिवाजी जीम यांच्याकडून टीम शिवाज क्लासिक या शरीरसौष्ठव स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोवा येथील बॉडी बिल्डरांसाठी ही खुली बॉडी बिल्डिंग स्पर्धा शनिवार ११ जानेवारी २०२५ रोजी सावंतवाडी शिवउद्यान येथे आयोजित केली आहे. रोमांचक अशा या शरीरसौष्ठव स्पर्धेत रोख बक्षिसे, आकर्षक ट्रॉफी, पदके, प्रमाणपत्रे आणि भेटवस्तू विजेत्यांना प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन टीम शिवाजीचे शिवाजी जाधव व बॉडी बिल्डर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केले आहे.