कणकवलीत राजधानी एक्सप्रेसच्या धडकेत तीन म्हैशी ठार...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 03, 2023 11:34 AM
views 172  views

कणकवली : येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसची धडक बसून रेल्वे गेट जवळ स्टेशच्या दिशेने जाणाऱ्या तीन म्हैशी जागीच ठार झाल्याची घटना २ ऑक्टोबरला सकाळी ९:४५ वा. च्या सुमारास कणकवली रेल्वे स्टेशन ते हळवल - वागदे रेल्वे ब्रिज दरम्यान घडली. यातील तीन जनावरांमध्ये एका दुभत्या  म्हैशीचा समावेश आहे. तर साधारपणे एक तास राजधानी एक्सप्रेस वागदे रेल्वे बोगद्यात उभी होती. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या वेळापत्रकात एक ते दीड तासाने बदल झाला आहे. 

दरम्यान, संदेश जाधव, भाई परब, संदीप जाधव, अंगुली कांबळे, रितेश कांबळे, विकास कासले यांनी धाव घेत रेल्वे ट्रॅकवरील त्या मृत  म्हैशिंना बाजूला केले.