'लाचलुचपत'च्या सापळ्यात तिघांना 31 मेपर्यंत पोलीस कोठडी

Edited by: मनोज पवार
Published on: May 29, 2025 19:55 PM
views 26  views

मंडणग़ड :  मंडणगड तहसील कार्यालयातील शेतजमीनीचा फेरफार नोंद करुन तसा सातबारा उतारा देण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी (27 मे) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या महसूलच्या तिघांचे अटकेची प्रक्रीया पुर्ण करुन आज  29 मे 2025 रोजी खेड येथील न्यायालयात हजर करण्यात आले  न्यायालयाने तिघांना 31 मे 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरीचे पोलीस उप अधीक्षक अविनाश पाटील यांनी दिली.

  शेतजमिनीचा फेरफार नोंद करून तसा सातबारा उतारा देण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी 27 मे 2025 रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत मंडळ अधिकारी म्हाप्रळ अमित शिगवण, म्हाप्रळ ग्राम महसुल अधिकारी (अतिरीक्त कारभार सोवेली सजा) श्रीनिवास श्रीरामे, व उपकोषागार कार्यालय मंडणगड येथील शिपाई मारुती भोसले यांना तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तालुक्यातील महसूल विभागाच्या एकाच वेळी तिघांवर लाच घेतल्याप्रकरणी केलेल्या कारवाईने मात्र तालुक्यातील शासकीय विभागाचे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.