
देवगड : पन्नास वर्षांत गझलच्या माध्यमातून पैस्यापेक्षा माणसे जोडत आलो.हिच खरी संपत्ती आहे.अनेकांशी जीवाभावाचे नाते जोडले आहे. जीवनात गझलने उर्जा दिली. जोडलेल्या माणसांमुळे उर्जा मिळत जाते. ७३ वर्षाच्या जीवन प्रवासात कधीच थकवा आला नाही. गाण्याच्या व सुरांच्या साथीने हे सारे शक्य झाले असे सांगितले. श्री. पांचाळे पुढे म्हणाले कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेने आज मी उभा आहे. खेड्यातून आलेला मी शहरात पोहचलो. त्यावेळी माझ्याकडे गमवण्यासारखे काही नव्हते. त्यामुळे कधीच दुःख करीत बसलो नाही. नेहमीच बेरजेचे जगणे असते. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध आम्हाला दिला.
त्यामुळे पंचशील मिळाले. जगण्याचा मार्ग तथागत गौतम बुद्धांनी दिला. त्या शिकवणीतून जीवनमार्ग सुरु आहे. मिठमुंबरी गावातील सामाजिक समता पाहून आनंद झाला. येथील आनंद विहाराच्या उपक्रमात आणखीन भरीव कामगिरी करण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. मिठमुंबरी हे गाव माझे समजतो. येथील प्रत्येक कुटुंबातील मी व माझे कुटुंब सदस्य आहे असे सांगितले. गेली पन्नास वर्षे गझलच्या माध्यमातून असंख्य माणसे जोडली. पैस्यापेक्षा माणसे जोडली ही खरी संपत्ती असून माझ्यासाठी अत्यंत मुल्यवान आहे. या संपत्तीचे मोजमाप करता येत नाही. गझलने मला जीवनात उर्जा दिली. तर यातून जोडलेल्या माणसांमुळे उर्जा मिळत असते. हे सर्व गाण्याच्या व सुरांच्या साथीने जोडले असे प्रतिपादन गझलनवाज पंडित भिमराव पांचाळे यांनी केले.
मिठमुंबरी येथील आनंद बुद्ध विहाराच्या पाचव्या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी गझलकार पांचाळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आनंद विहाराच्या उपक्रमासाठी पांचाळे यांचेही योगदान असल्याबद्दल आनंद विकास मंडळ मिठमुंबरी (रजि) गाव व मुंबई शाखा, पंचशील महिला मंडळ, मिठमुंबरी, आनंद क्रीडा समिती, आनंद वाचनालय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष भाऊ मुंबरकर तसेच विचारमंचावर मुंबई मंडळाचे अध्यक्ष राजपाल मुंबरकर, सरपंच बाळकृष्ण गावकर, उपसरपंच गुरुनाथ गावकर, महिला मंडळ अध्यक्ष अर्पिता मुंबरकर,सौ. गीता पांचाळे, ग्रामपंचायत सदस्य मिनल मुंबरकर, पोलीस पाटील दयानंद मुंबरकर, सल्लागार डॉ. राजेंद्र मुंबरकर, यशपाल मुंबरकर, उपाध्यक्ष विश्वास मुंबरकर, नितीन मुंबरकर, सचिव प्रवीण ध. मुंबरकर आदी उपस्थित होते. गझलनवाज पांचाळे यांनी मार्गदर्शन करताना गझल कार्यक्रमाच्या माध्यमातून गेली पन्नास वर्षात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांच्या मदतीसाठी काम करतात आले. मिठमुंबरी गावातील सलोखा पाहून खूपच समाधान वाटले. कोणत्याही प्रकारची जातीयता नसलेला हा गाव इतरांनी आदर्श घेण्यासारखा आहे. प्रत्येकांनी माणसे जोडली पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुंबई अध्यक्ष राजपाल मुंबरकर यांनी आनंद विहाराच्या उभारणीमध्ये गझलनवाज पंडित भिमराव पांचाळे यांचा मोठा वाटा आहे. मिठमुंबरी हे आपले गाव असून कुटुंब प्रमुख या नात्याने त्यांनी मंडळाच्या प्रत्येक उपक्रमात हातभार लावला आहे. गावातील सामाजिक सलोखा व समता यामुळे या उपक्रमात गावातील लोकांचेही सहकार्य मिळाले आहे. यापुढेही मंडळाच्या विकासासाठी विविध उपक्रम हाती घेऊन वाडी व गाव विकासासाठी आमचा प्रयत्न राहील असे सांगितले. यावेळी सरपंच गावकर यांनी सिद्धार्थनगराच्या विकासासाठी आपलेही योगदान कायम असेल असे सांगितले. याप्रसंगी पांचाळे यांच्या हस्ते सरपंच बाळकृष्ण गावकर, उपसरपंच गुरुनाथ गावकर, श्री मुंब्रेश्वर मुंब्रादेवी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष पांडुरंग डामरी, सामाजिक कार्यकर्ते नरेश डामरी, कुणकेश्वर माजी सरपंच रामानंद वाळके, सामाजिक कार्यकर्ते हेमंत तोडणकर, लवू तोडणकर, श्री मुंब्रेश्वर मुंब्रादेवी देवस्थान ट्रस्ट मधलीवाडी अध्यक्ष दयाळ गावकर, काका गावकर, ग्रा. पं. सदस्य मिलन मुंबरकर, पोलीस पाटील दयानंद मुंबरकर, बॉक्सिंग स्पर्धेतील विजेता कु. वीर मुंबरकर, कुणकेश्वर सोसायटी उपाध्यक्ष भाऊ मुंबरकर, देवगड अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य भालचंद्र मुंबरकर, कु. मोहनीश मुंबरकर, सेवानिवृत्त अधिकारी राजपाल मुंबरकर, सेवानिवृत्त कर्मचारी युवराज मुंबरकर, शशिकांत कदम तसेच शालेय परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी, विशेष प्राविण्य प्राप्तांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक जनीकुमार कांबळे-फोंडाघाट यांनी मार्गदर्शन केले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन मंडळाचे सचिव राजेंद्र नारायण मुंबरकर यांनी केले तर आभार प्रवीण मुंबरकर यांनी मानले.