शिवसेनेच्या वर्धापनदिनासाठी हजारो कार्यकर्ते रवाना...!

Edited by: दिपेश परब
Published on: June 19, 2023 11:06 AM
views 258  views

वेंगुर्ला : शिवसेना पक्षचा ५७ व्या वर्धापन दिनाच्या मुंबई, गोरेगाव येथील कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते रवाना झाले आहेत. वेंगुर्ला शिवसेना कार्यालयाकडून येथे सहभागी होण्यासाठी शिवशाही एस. टी. रवाना करण्यात आली. यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर याच्या हस्ते श्रीफळ वाढवून एस टी बस रवाना करण्यात आली. 

यावेळी वेंगुर्ला शिवसेना तालुका प्रमुख नितीन माजरेकर,  जिल्हा सघटक सुनील डुबळे, उपजिल्हा संघटक बाळा दळवी, उपजिल्हा प्रमुख सुनील मोरजकर, मच्छीमार सेल तालुका प्रमुख गणपत केळुसकर, उपतालुका प्रमुख कौशिक परब, माजी पंचायत समिती सदस्य समाधान बांदवलकर, उपशाखा प्रमुख शिवाजी पडवळ, आर्यन डूबळे, शामसुंदर कोळबकर, रुपेश दीपनाईक, तात्या कोंडसकर , यतिष वराडकर,  दिलीप मठकर, समृद्धी मोरजकर, अनिश मोरजकर, बाळू  सावंत, सुधीर धुरी, अंनत धुरी , सतीश माजरेकर, मारुती वाघे, सौरभ मांजरेकर, विशाल धुरी, निखिल धुरी, श्रीराम केरकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.