शरद पवारांच्या अंगाखांद्यावर खेळणारे कृतघ्न निघाले : डॉ. जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादीची तोफ कोकणात धडाडली
Edited by: विनायक गावस
Published on: July 11, 2023 16:24 PM
views 150  views

सिंधुदुर्ग : राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांचे कट्टर समर्थक, फायरब्रॅण्ड नेते, विरोधीपक्षनेते जितेंद्र आव्हाड यांची सावंतवाडी संस्थान मराठा समाज हॉल कुडाळमध्ये सभा होत आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील महत्त्वाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित आहेत. 

यावेळी विरोधीपक्षनेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, कोकणी माणूस वेगळा आहे. नाव घेतलं नाही तर प्रोब्लेम होतो. आलेल्या प्रसंगाला सामोरे जायचं ह्या मातीत आहे. म्हणूनच इथे शेतकरी आत्महत्या होत नाहीत. या पट्ट्यात अनेक कलाकार जन्माला आलेत ज्यांचं नाव ऐकून मुंबई घाबरायची‌. प्रविण भोसले या वयात देखील शरद पवारांसोबत आहे. शरद पवारांनी घरी बसावं यासाठी हे सगळं चाललंय का ? बापाला घरी बसावायची महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? भर भाषणात घरी का नाही बसत अस विचारता. आज ते ८४ वर्षांचे आहेत तुम्ही आम्ही साठी पार करणार आहात हे पण ध्यानात ठेवा असं मत त्यांनी व्यक्त केल.

ते पुढे म्हणाले, २५ वर्ष मंत्री पद भोगली. एवढं देऊन देखील तुम्ही शरद पवारांना घरी बसा असं सांगता. तुम्हाला केवळ कृतघ्नचं म्हणाव लागेल. कॅन्सरमधून बाहेर पडले तेव्हा सभांना तुम्हाला शरद पवार लागत होते. आज अचानक त्यांच वय दिसायल लागल‌‌. मासे, आंबा आणि शरद पवार हे एक नातं आहे. त्यामुळे कोकणाशी असणारा त्यांचा जिव्हाळा ओळखा. शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना काय दिलं ? ८ वेळी संसदरत्न झाल्या त्या स्वतःच्या कर्तृत्वावर झाल्या. बापाच्या नावार झाल्या. मंत्री म्हणून स्वतःच्या मुलीला पुढे नाही केलं. हा जितेंद्र आव्हाड शरद पवार नसते तर दिसला सुद्धा नसता. मंत्री दीपक केसरकर ज्या पक्षात जातात त्या पक्षाचे कर्ताकर्वीता आपणच आहोत असं दाखवतात. ५० खोके आल्यानंतर १ खोका सावंतवाडीकरांवर खर्च केला तर काय फरक पडतो असा टोला त्यांनी हाणला. एक रूपया न घेता फक्त प्रेमापोटी जमलेली माणसं या सभागृहात जमलेली आहेत याचा अभिमान आहे. 

जितेंद्र आव्हाड आयुष्यात निष्ठा विकू शकत नाही. कालपर्यंत ज्यांना शिव्या घालत होता आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलात. आज नवीन मुलं व्यक्त होतायत. सोशल मिडियावर पोलिसांचा दबाव आहे. युवा पिढी शरद पवारांसोबत आहेत. विद्रोह हा महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध आहे. मुघल साम्राज्याचा विरूद्ध उभं राहणं सोपी गोष्ट नाही. आईनं जे शिकवलं ते शिवाजी महाराजांनी दाखवून दिल. म. ज्योतिबा फुले नसते तर महिला आज इथे दिसल्या नसत्या. सावित्रीबाईंना पुढं आणून महिलांना त्यांनी शिक्षण दिलं. छ. शाहू महाराजांनी तर इतिहास घडवला. बहुजन समाजाला बदलण्यासाठी मदत करणारा राजा म्हणजे शाहूराजे. शाहू, फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे घेऊन जाणारा नेता म्हणजे शरद पवार. 

शरद पवारांच्या मनातलं यांना ओळखता आलं नाही. फक्त बाजूला खुर्चीत बसला पण वैचारिक बैठकीत तुम्ही नव्हता. फुले, शाहू, आंबेडकर यांचा गौरव करणारे नेते हेडगेवारांचा गुणगान गाणार का ? असा सवाल त्यांनी केला. गेल्या २५ वर्षात लढणारे शरद पवार मुली अन नातवासाठी लढत नाहीत. आपला समाज सुधारावा, जातीयवादी विळख्यातून महाराष्ट्र मोकळा व्हावा ही त्यांची इच्छा आहे. शरद पवार बाजूला बरे वाटतात, समोर उभे ठाकलेले शरद पवार तुम्हाला झेपणार नाही. ते शरद पवार आहेत. ती एक ताकद आहे. वय कितीही असो, शरद पवार त्यांना घरातला माणूस वाटतो. तुम्ही विचार सोडले मग शरद पवारांचा फोटो का वापरता ? असा सवाल त्यांनी केला. आज एकतरी मुसलमान सुरक्षित आहे ? त्तांच्या मनात भिती आहे. इथला मुसलमान हा भारतातलाच आहे. दुसरं राष्ट्र निर्माण होताना तो भारतासोबत राहीला. मुस्लिम , ख्रिस्ती, दलितांना मारझोड सुरु आहे. दलीत मुलाच्या अंगावर लघुशंका केली जातेय. हे थांबविण्यासाठी आजवर अनेकांनी लढा दिलाय. पण, आज मुख्यमंत्री एक शब्द काढत नाहीत. राहुल गांधी सोबत आहेत. नेतृत्वाखाली लढू असं सांगायला आली. तर अंगाखांद्यावर खेळवल ते आज कृतघ्न झालेत. 

संविधान टिकवायच की नाही ? यासाठीची ही लढाई आहे. ८३ वर्षांचा योद्धा त्यासाठी मैदानात आहे. कर्नाटकातील जनतेन संविधान टिकवण्यासाठी कॉंग्रेसला बहुमत दिलं. लोकांना महाराष्ट्रातील परिस्थिती मान्य नाही. पक्षावर अधिकार सांगायचा अधिकार तुम्हाला नाही. या वयात पवरांवर जी वेळ आली ती कुणाच्या बापावर येऊ नये. शरद पवार नावाचा झंझावात आता थांबवता येणार नाही. त्यांची इर्शा जिवंत ठेवण्यासाठी असेच एकत्र रहा, पुरोगामी महाराष्ट्रासाठी शपथ घ्या असं आवाहन त्यांनी केले.

 यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, व्हिक्टर डांन्टस, प्रसाद रेगे, शेखर माने आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.