
बांदा : सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि अर्चना फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी तालुक्यातील सरमळे येथील सात जाबाज युवकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात श्री देव सपतनाथ देवस्थान जवळ अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या वाहने आणि वाहन चालकांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या जाबाज सात युवकांचा सत्कार शुक्रवारी 28 जुलै 2023 ला सकाळी 10.30 वाजता सरमळे आमराई, बांदा - दाणोली जिल्हा मार्ग येथे करण्यात येणार आहे.
संजय सावंत सरमळे, विश्वजीत गावडे सरमळे,संजय गावडे सरमळे,रजत देसाई सरमळे, अक्षय तळवडेकर सरमळे,एकनाथ दळवी विलवडे, संजय गावकर ओटवणे या ७ युवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देताना शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार व सचिव मयुर चराठकर यांनी केल आहे.