..असा होणार कोकणसाद LIVE चा वर्धापनदिन

देदिप्यमान वाटचाल दशकपूर्तीकडे
Edited by: ब्युरो
Published on: March 25, 2023 17:00 PM
views 338  views

सावंतवाडी : दशकपुर्तीकडे यशस्वी वाटचाल करत डिजिटल आणि इलेट्रोनिक मीडियात क्रांतीचा इतिहास घडवणाऱ्या कोकणचं नं. 1 महाचॅॅनेल कोकणसाद LIVE चा 9 वा वर्धापनदिन होतोय. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनोख्या पद्धतीने हा सोहळा साजरा होतोय. दशकपूर्तीनिमित्त सावंतवाडीतील ऐतिहासिक राजवाडा इथं रविवारी 26 मार्चला सायं. 6 ते 8 या वेळेत भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. यानिमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महनीय व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे. तर विद्युत रोषणाई आणि लेजर शो मुख्य आकर्षण ठरणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर लोकप्रतिनिधी, मंत्री यांची उपस्थिती असणार आहे. तरी सोहळयाला उपस्थित राहण्याचं आवाहन टीम कोकणसाद LIVE आणि मुख्यसंपादक सागर चव्हाण यांच्यावतीने करण्यात आलंय. 

कोकणचं नंबर वन महाचॅनेल कोकणसाद LIVEनं अल्पावधित उत्तुंग झेप घेतली. डिजिटल मिडीया, टीव्ही चॅनेल आणि प्रिंट मिडीया असा कोकणातल्या पहिल्याच परिपूर्ण मिडीया हाउसचा, तब्बल दशकपुर्तीकडं यशस्वीरीत्या झेपावणारा हा प्रवास कोकणच्या या मातीतली जिदद आणि आत्मविश्वास याचंच मूर्तीमंत उदाहरण आहे. पहिली बातमी आणि पहिली ब्रेकींग म्हणजेच कोकणसाद लाईव्ह हे समीकरण आम्ही कोकणवासीयांच्या हदयात रूजवु शकलो. बातम्यांसोबतच आम्ही थेट समाजाशी जोडले गेलो ते आमच्या सामाजिक उपक्रमांमुळं. सिटी ऑन सायकल, तुमच व्हिजन आमचं मिशन, कोरोना काळातील शैक्षणिक, कृषी, आरोग्य क्षेत्रातील उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला. 9 वर्षांच्या देदिप्यमान वाटचालीनंतर आता कोकणसाद LIVE दशकपुर्तीकडे वाटचाल करतय. सावंतवाडीतील ऐतिहासिक राजवाडा इथं 26 मार्चला या वर्धापनदिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. 

दशकपुर्तीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाची सुरुवात मालवण येथील सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांच्या स्वराज्य ढोलपथकाने करण्यात येणार आहे. तसेच, सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना स्नेहल पार्सेकर यांचा गणेश वंदनाने मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे. कोकणचे सुपुत्र, मालवणी कॉमेडी किंग दिगंबर नाईक हे देखील उपस्थित राहणार आहे. आपल्या खास शैलीत मालवणी गाऱ्हाण घालणार आहेत. 'मोस्ट व्हायरल बाप्पा' या ग्लोबल गणेश स्पर्धेचं बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते केलं जाणार आहे.  सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा कोकणसाद LIVE च्या खास स्मार्ट लीडर पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. ऑक्सिजन टुरीझम अभियानाच्या अनुषंगाने कोकणसाद LIVE चा मानाच्या कोकण ऍग्रो टुरिझम रत्न या सर्वोच्च पुरस्काराने कृषी आयडॉल दादा सामंत यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ऐतिहासिक राजवाडा परिसर आणि मोती तलाव काठ परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. हा खास लाईट आणि लेजर शो मुख्य आकर्षण ठरणार आहे.

सावंतवाडी येथील ऐतिहासिक राजवाडा इथं रविवारी 26 मार्चला सायंकाळी 6 ते 8 या वेळेत या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. तरी या सोहळ्याला मोठ्या संख्यने उपस्थित राहण्याचं आवाहन टीम कोकणसाद LIVE आणि मुख्य संपादक सागर चव्हाण यांच्यावतीने करण्यात आलंय.