रविवार १ ऑक्टोबर रोजी 'या' शाळा राहणार सुरू...!

Edited by:
Published on: September 29, 2023 18:28 PM
views 903  views

कुडाळ : सिंधुदुर्गातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा रविवारी एक ऑक्टोबर रोजी चालू ठेवाव्यात असा आदेश जिल्हा परिषदे माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी काढला आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सुभाष चौगुले यांनी एक पत्र काढून शासनाच्या पत्राचा संदर्भ देत ही अधिसूचना लागू केली आहे. यापत्रात ईद-ए-मिलाद ची सुट्टी दी 28 सप्टेंबर ऐवजी शुक्रवार 29 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील सर्व अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा (सर्व ) यांनी 29 सप्टेंबर रोजी सुट्टी घ्यावी व दिनांक 1 ऑक्टोबर रोजी शाळा सुरू ठेवण्यात याव्यात असे या आदेशात म्हटले आहे.