मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मार्गी लागण्यासाठी राजू मसुरकर यांनी सुचवले 'हे' पर्याय

शिक्षणमंत्री व पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी
Edited by: विनायक गांवस
Published on: February 09, 2023 19:36 PM
views 220  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाच्या जागे अभावी रखडलेल्या कामाला पर्यायी मार्ग म्हणजे प्रत्येक राष्ट्रीय पक्षाच्या पार्टीला उद्योगपतींकडून आर्थिक फंड दिला जातो, त्यातून राजघराण्याला तीन एकर जमिनीचा मोबदला देऊन जागा खरेदी करावी किंवा उद्योगपतींना पंचवीस, तीस कोटीचा फायदा करून दिल्यास त्यांच्यामार्फत आवश्यक असलेली जमीन खरेदी करावी. त्यापेक्षा शिर्डी साईबाबा संस्थान मार्फत आवश्यक असलेली जागा खरेदी करावी व शासनाला हस्तांतर करावे, असे मत जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी व्यक्त केले आहे. 


सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी तालुका सावंतवाडी शहर उपजिल्हा रुग्णालयामध्ये मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल या जमिनीच्या प्रश्नामुळे हे रुग्णालय शासनाची कोट्यावधी रुपयांची निधी असूनही जमिनीच्या प्रश्नांमुळे हे रुग्णालय होऊ शकत नाही. जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना जागा उपलब्ध व्हावी, यासाठी पर्यायी मार्ग सुचवले आहेत. यात पर्याय मार्ग एक : प्रत्येक पक्षाकडे राज्य व केंद्रस्तरीय पार्टी वेगवेगळे उद्योगपतींकडून कोट्यावधी रुपयांचा फंड जमा केला जातो.  त्या पार्टी फंडामधून काही कोट्यावधी रुपयांची रक्कम पार्टी करून राजघराण्याला त्यांच्या मालकीची असलेली जमीन आर्थिक मोबदला देऊन ती जागा शासनाकडून हस्तांतर केली तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो.


पर्याय दोन : मोठ्या उद्योगपतीना शासनाकडून आर्थिक पंचवीस तीस कोटींचा फायदा करून दिल्यास त्या उद्योगपतींकडून राज घराण्याची जागा त्यांना हवी असलेल्या मोबदला उद्योगपतींकडून मिळवून दिले तरीही जागा उद्योगपती मार्फत जागा खरेदी करून शासनाकडे ही जागा उपलब्ध करून देऊ शकतो.


पर्याय तीन : महाराष्ट्राचे श्रद्धास्थान शिर्डी साईबाबा ट्रस्ट मार्फत जागा राजघराण्याला हवी असलेल्या आर्थिक मोबदला दिला तर शिर्डी साईबाबा ट्रस्ट मार्फत उपलब्ध करून देऊन शासनाकडे ही जागा हस्तांतर केल्यास त्याचा फायदा जनतेला होऊ शकतो. तसेच होणाऱ्या मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलला साईबाबा ट्रस्टचे नाव देऊन हा प्रश्न मार्गी लागू शकतो. साईबाबा ट्रस्टकडे कोट्यावधी रुपयांचा फंड जमा आहे.  त्यामध्ये विश्वस्त मंडळ हे शासनाची नेमणूक केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत मार्गी लागू शकतो.


महाराष्ट्रमध्ये आतापर्यंत सर्व रुग्णालय मोफत बक्षीस पत्रांनी उपलब्ध झाले असून त्या जमिनीवर रुग्णालय उभारले आहे. त्यामुळे शासन निर्णय हा जमीन खरेदी करण्याचा नसून त्यामुळे अडचणींचा प्रश्न मल्टिपेशालिस्ट रुग्णालयाला होत आहेत. आतापर्यंत राजघराण्याने शासनाला आपल्या मोफत जागा देऊन जनतेला मोठा दिलासा दिला आहे. मुलांना खेळण्यासाठी जिमखाना मैदानाची जागा एसटी स्टँड बस स्थानकाची जागा आता असलेल्या शिल्पग्रामची जागा, श्रीराम वाचन मंदिरची  जागा, मोती तलावानजीक असलेल्या जगन्नाथराव भोसले गार्डनची जागेचा काहीच भाग, श्री पंचम खेमराज कॉलेजची जागा, राणी पार्वती देवी हायस्कूलची जागा, सावंतवाडी जानकीबाई श्रुतिकागृहाची जागा, सध्या असलेल्या जुन्या इमारतीतील रुग्णालय हे संस्थान काळापासून बापूसाहेब महाराजांनी दिले. आता मोजक्यात  जागा राजघराण्याच्या शिल्लक राहिला असून त्यांच्याकडून मोफत जागा मागणे हे फार चुकीचे असून तरी असूनही शासन नियमानुसार ( दरसूची मध्ये ) आर्थिक मोबदला दिल्यास असा प्रस्ताव राज्यघराण्यांनी शासनाकडे दिला असून हा प्रश्न सीमावादासारखा प्रलंबीत करून जनतेची होणारी निराशा राजकर्त्यांकडून दूर करण्यात यावी.


मनाचा शुद्धपणा यांचा विचार करून हा प्रश्न मी दिलेल्या पर्यायांप्रमाणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांनी शुद्ध हेतूने मार्गी लावला तर जनता त्यांना धन्यवाद देईल, सध्या जिल्हा रुग्णालय सावंतवाडीत व्हावे, अशी मागणी करणे चुकीचे असून जिल्ह्याच्या मध्यभागी ओरोस येथे रुग्णालय सीमावादासारखा प्रश्न करून ठेवायचा, हे फार चुकीचं असून ओरोस येथील मेडिकल कॉलेज मंजूर झाले आहे. दोनशे बेडचे जिल्हा रुग्णालय असल्यामुळे ओरोस येथील मेडिकल कॉलेज केंद्र व राज्य सरकारने मंजूर केले असून पुन्हा सीमा वादासारखा प्रकार राज्यकर्त्यांकडून होऊ नये,  अशी भावना जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी व्यक्त केली आहे.