कोकणात येत्या ४८ तासात असा आहे पावसाचा अंदाज...!

Edited by:
Published on: June 07, 2024 11:29 AM
views 1306  views

सिंधुदुर्ग : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि. ०७ व ८ जून २०२४ रोजी यलो अलर्ट तर दिनांक ०९, १० व ११ जून रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच दि. ०७ व ०८ जून २०२४ या कालावधीत जिल्ह्यात गडगडाट होऊन पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक ०७ जून रोजी  ५० ते ६० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  तसेच दि. ०९ जून ते १९ जून या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.