
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीतून बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवार विशाल परब यांची जंगम मालमत्ता ९ कोटी ७६ हजार १४८.०८ रू. एवढी आहे. तर स्थावर मालमत्ता १६ कोटी ९ लाख ६१ हजार इतकी असल्याचे उमेदवारी दाखल करतानाच्या विवरणपत्रात नमुद केले आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी आपल्या अर्जात स्थावर व जंगम मालमत्तेचे विवरण दाखविले आहे. यानुसार विशाल परब यांयांची जंगम मालमत्ता ९,००,७६,१४८.०८ असून पत्नीची १,३८,४७,२६७.२८ एवढी आहे. स्थावर मालमत्ता १६,०९,६१,००० एवढी आहे. विशाल परब यांच्याकडे ३ लाख व पत्नीकडे अडीच लाख रोख रक्कम हाती आहे. विशाल परब यांच्या प्रलंबित असणाऱ्या फौजदारी खटल्यांची एकूण संख्या १ आहे. ६,९०,६२,९७०.२८ एवढे त्यांचे व ६,७७,८५८ पत्नीचे दायित्व आहे. एकूण मूल्य ८,५२,९४,८८४ रू.वाहने विशाल परब यांच्याकडे तर पत्नीकडे ६३,३३,५६९ ची वाहन आहेत. पत्नीकडे असणाऱ्या जडजवाहीर, सोनेचांदी मौल्यवान वस्तु या ६३,२४,४६६ रूपयांच्या आहेत.