रेडी ब्राम्हण मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन..

द्वितीय जीर्णोद्धार - शिखर कलश स्थापना सोहळा
Edited by:
Published on: December 31, 2023 14:33 PM
views 217  views

वेंगुर्ले : रेडी येथील श्री देव ब्राम्हण बांदवा मंदिराचा जीर्णोद्धार व ब्राम्हण मंदिराचा शिखर कलश स्थापना द्वितीय वर्षपूर्ती सोहळा सोमवार दि. ०१ जानेवारी २०२४ ला विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. सकाळी ८ ते १ विष्णुयाग, १ ते ३ आरती व महानैवेद्य, सायंकाळी ६ ते ७ भजन, ८ ते १० वारकरी भजन तसेच रात्री १० नंतर वाडेकरी भजन आणि देवाचा कौल होणार आहे.  या सर्व कार्यक्रमांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.