असा होणार आ. दीपक केसरकरांचा 16 जुलैला वाढदिवस

Edited by: विनायक गांवस
Published on: July 12, 2025 18:43 PM
views 196  views

सावंतवाडी : राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचा १८ जुलै रोजीचा वाढदिवस यंदा १६ जुलै रोजी सावंतवाडी येथे साजरा होणार आहे. शिवसेना आणि नामदार दीपक केसरकर मित्रमंडळ यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती शहरप्रमुख बाबु कुडतरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

यात श्री. कुडतरकर म्हणाले, आमदार केसरकर १६ जुलै रोजी सायंकाळी ७ ते १० या वेळेत सावंतवाडी येथील गोविंद चित्र मंदिर येथे कार्यकर्त्यांना आणि शुभचिंतकांना भेटून शुभेच्छा स्वीकारणार आहेत. आमदार केसरकर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ते शासकीय कामांमध्ये व्यस्त असणार असल्याने  वाढदिवस दोन दिवस अगोदर साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमात शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांनी पुष्पगुच्छ किंवा कोणतीही भेटवस्तू आणू नये, केवळ गुलाब पुष्प आणल्यास चालेल असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच शुभेच्छा कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, माजी नगरसेविका शर्वरी धारगळकर, दिपाली सावंत, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, ललिता सिंग, संजय गावडे, अर्चित पोकळे, सुजित कोरगावकर, प्रकाश बिद्रे, विश्वास घाग, विनोद सावंत, एकनाथ हळदणकर, दत्ता सावंत शैलेश मेस्त्री बबन शेळके,विनायक म्हाडेश्वर आदी उपस्थित होते.