12वी कणकवली तालुक्यात तिसरी ; काँग्रेसच्यावतीने सानिका सावंतचा सन्मान

Edited by: उमेश बुचडे
Published on: May 29, 2023 19:52 PM
views 72  views

कणकवली : बारावीच्या परीक्षेत कणकवली कॉलेजच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी सानिका सावंत हिने ९३ ५० टक्के गुण मिळवून तालुक्यात तृतीय येण्याचा मान पटकाविला आहे. याबद्दल तिचे कणकवली तालुका काँग्रेसच्यावतीने सत्कार करण्यात आला.


यावेळी तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, सरचिटणीस महेश तेली, शहराध्यक्ष अजय मोरये, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष अमृता मालंडकर, उपाध्यक्षा आयेशा सय्यद, गौरी तेली, डॉ. प्रमोद घाडीगावकर, प्रदीपकुमार जाधव, अमित मांडवकर, नीलेश मालंडकर, अक्षय घाडीगावकर, पंढरी पांगम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.