
देवगड : देवगड पडेल कॅन्टीन येथे रात्री जवळपास १.वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी स्वप्नील कोकरे यांची बेकरी दुकान, तसेच सखाराम भाऊ येंडे यांचे बांगडी आणि जनरल स्टोअर्स, तसेच एक चहाचे दुकान फोडुन चोरी केली आहे.
लोखंडी शिगेची प्रहार वापरून सदर दुकानांची कुलुपे तोडन्यात आली व त्याच्या साहाय्याने चोरट्यांनी दुकाने फोडली. यामध्ये बेकरी मध्ये सुमारे ३०००/- रुपये, येंडे यांच्या दुकानांमधून सुमारे ३०००/- तर चहा दुकानातून १५००/- रुपये अशी रोख रक्कम चोरट्यांनी साफ केली आहे. श्वानपथक तसेच ठसेतज्ञ अभ्यासक पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. खाजगी दुकानांच्या सी सी टि व्ही फुटेजमध्ये एकच चोरटा दिसत असून त्याने चेहऱ्यावर रुमाल बांधलेला दिसत आहे.विजयदुर्ग चे पोलीस अधिकारीया या चोरी बाबत अधिक तपास आपल्या टीम सोबत करत आहेत.