कलमठमध्ये दोन बंद घरे चोरट्याने फोडली

30000 रकमेसह एक सोन्याची अंगठी चोरली
Edited by:
Published on: July 24, 2024 07:01 AM
views 77  views

कणकवली : शहरालगतच्या कलमठ मुस्लिमवाडी येथील दोन बंद घरे चोरट्यांनी फोडली. यात एका घरातील कपाट फोडून ३० हजार रुपयांची रोकड तसेच एक सोन्याची अंगठी चोरट्यांनी पळविली. कौले काढून चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. या घटनेबाबत रज्‍जाक शेख यांनी कणकवली पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कलमठ मुस्लिमवाडी येथील रज्‍जाक दाऊद शेख यांची दोन घरे आहेत. ते अधून मधून मुंबईला असतात. दहा दिवसांपूर्वी ते दोन्ही घरे बंद करून मुंबईला गेले होते. दरम्‍यान, काल त्‍यांचा मित्र घराकडे गेला असता कौले काढलेली दिसली. त्‍यांनी याबाबतची माहिती रज्‍जाक शेख यांना दिली. त्‍यानंतर शेख हे मुंबईहून कलमठ येथे दाखल झाले. त्‍यावेळी घराची कौले काढून चोरटे घरात घुसले असल्याचे आणि घरातील कपाट फोडून आतील ३० हजार रुपयांची रोकड आणि एक सोन्याची अंगठी पळवून नेल्याची बाब दिसून आली. दरम्‍यान, दुसऱ्या घराचीही कौले काढून चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता; मात्र तेथे काहीही साहित्य नव्हते.