गद्दारांना गाडून भगवा फडकवणार ; ठाकरे सेनेचा निर्धार

Edited by: विनायक गावस
Published on: June 20, 2023 14:54 PM
views 144  views

सावंतवाडी : आगामी विधानसभा निवडणुकीत सावंतवाडीत सामन्य शिवसैनिक गद्दारी करणाऱ्यांना गाडून शिवसेनेचा भगवा फडकविणार असा निर्धार विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. 

शिवसेनेत गद्दारी होऊन आजचा दिवशी एक वर्ष पूर्ण होत आहे. ज्यांनी गद्दारी केली तेच बाळासाहेबांचे विचार जपल्याचे सांगत फिरत आहेत. पण, ज्यांनी बॅनरवर ५९ वा वर्धापन दिनाचे बॅनर लावले त्यांना शिवसेनेचा वर्धापन दिन नक्की कितवा आहे याची कल्पना नसलेले लोक बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात असल्याच सांगतात हे खरं दुर्दैव आहे. २० जूनला महाराष्ट्रात गद्दारी झाली. गद्दारांचा हा दिवस म्हणून ओळखला जाईल. विकासासाठी म्हणून पक्षाची उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली अस ते म्हणाले. शिवसेना पक्ष वाढवताना काहींनी प्रॉपर्ट्या विकल्या असं सांगितलं गेलं. मुंबईतील अनेक मेळाव्याना सावंतवाडीतून गाड्या, कार्यकर्ते जात आहेत. आता कोणत्या प्रॉपर्ट्या विकून हा खर्च केला जातोय ? अनेकांना देगण्या दिल्या जात आहेत. शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असताना चार बाय चारचे बॅनर लावले नाहीत. आता ४० बाय ४० चे बॅनर लागत आहेत. एवढा खर्च कुठुन करत आहेत ? हा ५० खोक्यांचा असर नाही ना ? असा सवाल सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केला. तर गेल्या वर्षभरात एकही विकासकाम यांना करता आलं नाही. केवळ जनतेची दिशाभूल करण्याच काम केलं. शिक्षणमंत्री खात्याला सुद्धा दीपक केसरकर न्याय देऊ शकले नाहीत. जिल्ह्यातील अनेक शाळा शिक्षकांविना बंद होत आहेत. अन् हे म्हणत आहेत विकासासाठी गद्दारी केली. मंत्री होऊन कोणता बदल केला ? बेरोजगारी, कबुलायतदार, आरोग्य, रेल्वे टर्मिनस कोणता प्रश्न मागच्या वर्षभरता सोडवला ? रस्त्यांची भुमिपूजन जुनं महिन्यात करतात हाच यांचा विकास आहे‌. ठेकेदारांना पोसायचे काम हे करत आहेत. हा दिवस आमच्यासाठी काळा दिवस आहे. वेदनादायी असला तरी खचून जाणारे शिवसैनिक नाहीत. ज्या आमदारानं गद्दारी केली त्यांना गाडत शिवसेनेचा भगवा इथे फडकवणार, उद्धव ठाकरेंकडे वाजत गाजत घेऊन जाणार अशी शपथ श्री. राऊळ यांनी याप्रसंगी घेतली. 

स्वताच्या स्वार्थासाठी दगाकरून हे बाहेर पडले. वर्षभरात लोकांचं  काय भलं केलं ? हे केसरकरांनी सांगावं. त्यांचा कालावधी देखील आता संपत आला आहे. दिलेली आश्वासने कधी पूर्ण करणार ? हे त्यांनी जाहीर करावं. सावंतवाडी विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येणाऱ्या काळात लोकसभा, विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या विचारांचा खासदार, आमदार निवडून देऊ अस मत शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी व्यक्त केले.

तर वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना राज्यात पेटून उठली आहे. आम्ही निवडणूकीची वाट पाहत आहोत. गद्दारांनी निवडणूकीत उभं राहून दाखवाव त्यांना धडा शिकवल्याशिवाय निष्ठावंत शिवसैनिक गप्प बसणार नाही. 

यावेळी उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, वेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत परब, माजी जि.प.सदस्य मायकल डिसोझासंदीप पेडणेकर, अजित राऊळ आदी उपस्थित होते.