
कणकवली : राणे कुटुंबाबद्दल सध्या काहीजण वेगवेगळ्या बातम्या पसरवत आहेत या सर्वांनी काही गोष्टींची शहानिशा करावी. मी असेपर्यंत राणे कुटुंबात कोणताही अंतर्गत वाद होणार नाही. कारण आमच्या कुटुंबामध्ये राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नसल्याचे माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट केले. मी गेली 35 वर्षे जिल्ह्यात राजकारण करत आहे, असेही राणे म्हणाले.










