
सावंतवाडी : "रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. शहरी भागात रक्तदानाचा प्रचार व प्रसार बऱ्यापैकी झालेला आहे. मात्र त्या प्रमाणात खेडेगावात अजूनही रक्तदानाबद्दल लोकांच्या मनामध्ये अनेक संभ्रम आहेत. ते संभ्रम दूर करून युवकांना रक्तदानाकडे एक चळवळ म्हणून बघता यावे, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोव्यात अनेक खेड्यापाड्यात रक्तदान शिबिरे घेण्याचा मानस आहे!", असे मत युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी तालुक्यातील माडखोल-धवडकी येथे विनेश तावडे व अमित राऊळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. माडखोल-धवडकी शाळेत घेण्यात आलेल्या या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे येथील युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, माडखोल सरपंच श्रुश्नवी राऊळ, उपसरपंच कृष्णा राऊळ, दत्ताराम कोळमेकर, माजी सरपंच संजय लाड, माडखोल धवडकी शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला गावडे, संतोष राऊळ, युवा रक्तदाता संघटनेचे अर्चित पोकळे, साईश निर्गुण, प्रकृती हॉस्पिटलचे डॉ. नीलेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिता राऊळ, संजय देसाई, समृद्धी शिरसाट, दीप्ती राऊळ, सावंतवाडी रक्तपेढीच्या डॉ. बागेवाडी, तंत्रज्ञ रेडकर, अनिल खाडे, पोलिस पाटील उदय राऊत, संजय राऊळ, प्रकाश मुरकर, लक्ष्मण बरागडे, नम्रता पानोळकर, शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला गावडे आदी उपस्थित होते.