
कणकवली : खोके सरकारने बजेट सादर करून अनुसुचित जाती जमाती समाजाच्या तोंडाला पाणी पुसायचे काम केले असल्याचा घनागती आरोप उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुजित जाधव यांनी केला आहे.
अनुसूचित जाती/जमातीसाठी उपयोजना परिणामकारक रित्या राबविण्यासाठी राज्यस्तरावर कायदा करण्याची मागणी करण्यात आली होती.पण बजेट मध्ये भाषणात काहीच उल्लेख नाही. बजेट भाषणात अनुसूचित जाती, जमातीच्या शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक, भूमिहीनांना जमीन, घरकुल- आवास , रोजगार, उपजीविका, आरोग्य , निवासी स्कूल्स, हॉस्टेल्स, इत्यादी बाबत काहीच उल्लेख नसल्याने अनुसूचित जमाती समाजाच्या लोकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम या खोके सरकारने केले असल्याचे जाधव यांनी सांगितले.
राज्याच्या 25 % लोकसंख्येच्या विकासाबाबत बजेट सादर करताना या समाजाच्या साधा उल्लेखहीं नाही. यावरून, शिंदे सरकारची उदासीनता स्पष्ट होते. मोठमोठ्या घोषणा असलेलं बजेट आज जाहीर करण्यात आलं असलं तरी अनुसुचित जाती आणि जमातींना अर्थंसंकल्पातून तोंडाला पानं पुसल्याचं दिसून येत आहे.
शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, विकास घडवून आणणे सोबतच, गरिबी निर्मूलन, रोजगार, निर्माण करून बेरोजगारी दूर करणे, उपजीविका, कुटुंबाचे उत्पनात वाढ होणे, मूलभूत गरजा भागविणे, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, संरक्षण, सन्मानपूर्वक जगणे, मूलभूत सेवा-सुविधा उपलब्ध करणे हा उद्देश बजेट सादर करण्यामागे आहे. समाजातील जे समाज घटक विकासात मागे आहेत त्यांना इतरांचे बरोबरीत आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे ही सरकारची जबाबदारी आहे. आणि हा हेतू बजेट मध्ये दिसून आला पाहिजे. या दृष्टीने, बजेटकडे पाहिले पाहीजे होते. तसं पाहिलं तर कोणतेही बजेट सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. परंतु बजेट मध्ये मात्र अनुसूचित जाती, जमाती, भटके-विमुक्त, ओबीसी, अल्पसंख्यांक यांचे कल्याण/विकास यासाठी विशेष योजना आणि योजनांवर भरीव तरतूद बजेट मध्ये असली तरच बजेट विकासाचे आहे, असे म्हणता येईल. बजेट सामान्य माणसाचे जीवन सन्मानाचे करणारे असले पाहिजे. परंतु ज्या प्रमाणे जिल्हा परिषदेच्या सत्ताधारी च्या चुका मुळे 12 कोटी रुपये मागे गेल्या नंतर आता खोके सरकारने हे बजेट सादर करून अनुसुचित जाती जमातीच्या तोंडाला पाणी पुसायचे काम केले असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे