
सावंतवाडी : माहिम विधानसभा मतदार संघातून केवळ नशिबाने निवडून आलेल्या आमदार महेश सावंत यांनी मुलाखत देताना राज ठाकरे महाराष्ट्रासाठी मोठे असतील, आमच्यासाठी नाही असे म्हणून त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला आहे. केवळ मत विभाजनाचा फायदा झाल्यामुळे नशिबाने आमदारकीची लॉटरी लागलेल्या महेश सावंत यांनी बोलताना विचार करून बोलावे. आपले हात आकाशाला टेकले आहेत या भ्रमात न राहता जमिनीवर पाय ठेवून बोलावे असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर यांनी दिला आहे.तसेच परत जर राज ठाकरे यांच्याबद्दल वेडेवाकडे बोलण्याची हिंमत केल्यास पुन्हा गावी येताना विचार करुन यावे लागेल असाही इशारा मनसे जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर यांनी दिला आहे.