
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे आहे. परंतु, महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादीला सोडल्यास अर्चना घारेंना निवडून आणायला आनंदच वाटेल, जोमानं त्यांच काम करू असं विधान खासदार विनायक राऊत यांनी तिरोडा येथिल एका कार्यक्रमात केलं आहे.
खासदार विनायक राऊत यांनी गावभेट दौऱ्यात तिरोडा गावास भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे आहे. परंतु, महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडल्यास अर्चना घारे यांना निवडून आणायला आनंदच वाटेल, कोणतीही कंजूसी न करता त्यांच जोमानं काम करून विजयी करू, तर जागा शिवसेनेकडे राहिली तर तुम्ही देखील तेवढ्याच ताकदीने काम करा, तुमचा योग्य तो मानसन्मान आम्ही राखू असं मत खासदार राऊत यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संजय पडते, बाळा गावडे, जान्हवी सावंत, मायकल डिसोझा, सागर नाणोसकर, दर्शना बाबर-देसाई आदी उपस्थित होते.