...तर बांदा शहरातील सर्व्हिस रोड बंद करू

साईप्रसाद काणेकर यांचा एमएनजीएलला इशारा
Edited by: विनायक गावस
Published on: June 18, 2023 12:43 PM
views 149  views

सावंतवाडी : एमएनजीएल गॅस पाईप लाईनचे काम करण्यासाठी बांद्यात ऐन पावसाळ्यात खोदाई करण्यात आली आहे.त्यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या व्यावसायिकांना नाहक त्रास करावा लागत आहे.या कंपनीच्या ठेकेदाराने बांदा शहरातील हा चीखलमय रस्ता आजच सुस्थितीत न केल्यास बांदा शिवसेना शहर दुसराही सर्व्हिस रोड बंद करेल असा इशारा बांदा ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शहर प्रमुख साईप्रसाद काणेकर यांनी दिला आहे.


एमएनजीएल पाइपलाइन टाकण्यासाठी संबधित ठेकेदाराने बांदा शहरातील सर्व्हिस रोड बंद करून खोदाई केली आहे.या खोदाईमुळे बाहेर आलेल्या मातीमुळे रस्ता चिखलमय झाला आहे.त्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यांनी व्यवसाय कसा करावा असा सवाल साईप्रसाद काणेकर यांनी विचारला असून ऐन पावसाळ्यात ही चिखलमय परिस्थिती निर्माण करणाऱ्या एमएनजीएल कंपनीने आजच्या आज रस्ता व्यवस्थित न केल्यास दुसऱ्या बाजूचा सर्व्हिस रोडही बंद करण्यात येईल असा इशारा साईप्रसाद काणेकर यांनी