
सावंतवाडी : दरवर्षी आंबोली घाटात रस्त्यावर झाडे पडद असतात. सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभाग कधीही एकत्रित रित्या धोकादायक झाडाबाबत सर्वे करून धोकादायक झाडे छाटणे किंवा कापणे यासाठी कार्यवाही करताना दिसत नाहीत. दरवर्षी झाडे रस्त्यावर पडल्यावर व रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्यावरच कार्यवाही करतात.
आंबोली ग्रामपंचायतने गेल्यावर्षी सुद्धा याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती संबंधित विभागाणा केली होती. यावर्षी सुद्धा केली आहे. मात्र, याबाबत ठोस कार्यवाही होताना संबंधित विभागाकडून होताना दिसत नाही असं मत आंबोली सरपंच सावित्री पालेकर यांनी व्यक्त केल.सुदैवाने आतापर्यंत मोठी जीवित हानी झाली नाही. मात्र, जर मोठा अपघात घडलाच तर त्याला पूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभाग जबाबदार असणार. पुन्हा एकदा विनंती करण्यात येत आहे की लोकांच्या जीवाशी खेळणे बंद करावे व लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी आंबोली सरपंच सावित्री पालेकर यांनी केली आहे.