उंबर्डेत खैरांची चोरी | तिघांविरोधात गुन्हा दाखल

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 12, 2023 20:07 PM
views 506  views

वैभववाडी : उंबर्डे कातकरवाडी जयंत शांताराम सावंत यांच्या मालकीची खैराची ५० हजार रूपये  किमंतीची  झाडे चोरल्याप्रकरणी पोलीसांनी गावातील तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.हा प्रकार २२ जानेवारीला घडला होता.सावंत यांनी याप्रकरणी आज तक्रार दिल्यानंतर या संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उंबर्डे येथील श्री.सावंत यांच्या मालकीची खैराची झाडे आहेत.यातील ५२ झाडे २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.यासंदर्भात श्री.सावंत यांनी आपल्या मालकीची ५० हजार रूपये किमंतीची ५२ झाडे गावातील संतोष सदाशिव मोपेरकर,संदीप गंगाराम खाडे,शरद सावळाराम मोपेरकर यांनी चोरल्याची तक्रार दिली.त्यानुसार पोलीसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.खोत हे करीत आहेत.