
वैभववाडी : नाधवडे धनगरवाडी येथील राजेंद्र कानू बोडेकर यांच्या घरासमोरील दुचाकी अज्ञाताने चोरट्यांने भरदिवसा लांबवली.हा प्रकार २२ नोव्हेंबरला घडला असुनबोडकर यांनी काल (ता.२५)पोलीसांत तक्रार दिली.
बोडेकर हे नाधवडे येथे कोकण दुध डेअरी नजीक असलेल्या धनगरवाडीत कुटुंबासमवेत राहतात.२२ नोव्हेंबरला श्री.बोडेकर आणि त्यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेली होती.त्यांचा मुलगा घरी होता.सायकांळी घरी आल्यानतंर त्यांच्या मालकीची दुचाकी (क्रमांक-एम एच.०७,अेके ४०८१)त्यांना दिसली नाही.त्यासंदर्भात त्याने आपल्या मुलाकडे विचारणा केली असता त्याला देखील काही नव्हते.त्यामुळे काल रात्री त्याने पोलीसांत तक्रार दिली.