नाधवडेत मंदिरात चोरी | सुमारे २५ हजारांची रक्कम चोरीला

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 27, 2024 13:56 PM
views 116  views

वैभववाडी : नाधवडे सरदारवाडी येथील श्री.दत्तमंदिरात चोरी झाली.मंदीरातील दानपेटी फोडुन अज्ञात चोरट्याने २५ हजार रूपयांची रक्कम लंपास केली. हा प्रकार काल ( दि. २६ ला ) रात्री झाला.

नाधवडे सरदारवाडी येथील दिगबंर शिवराम सावंत यांच्या मालकीचे श्री.दत्तमंदिर आहे.काल सायकांळी पुजाअर्चा झाल्यानंतर श्री.सावंत यांनी मंदिर गाभाऱ्याचा दरवाजा बंद करून ते घरी गेले.त्यानंतर आज सकाळी पुन्हा पुजेसाठी गेले असता त्यांना गाभाऱ्याचा दरवाजा उघडा दिसला.अज्ञाताने दानपेटी देखील फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.याबाबत त्यांनी वैभववाडी पोलीसांत तक्रार दिल्यानंतर पोलीस हवालदार रमेश नारनवर घटनास्थळी गेले.दानपेटीत सुमारे २५ हजार रूपयांची रक्कम असल्याचे सावंत यांनी पोलीसांनी सांगीतले.या चोरी प्रकरणाचा तपास नारनवर करीत आहेत.