कणकवली शहरात पुन्हा चोरी | १४ तोळे सोने लंपास

Edited by:
Published on: April 25, 2024 11:46 AM
views 1049  views

कणकवली : शहरात परबवाडी येथील नरेंद्र रामचंद्र सावंत यांच्या घरात १८ एप्रिल ते २४ एप्रिलच्या दरम्यान बेडमध्ये ठेवलेल्या १४ तोळे सोने चोरट्याने लंपास केल आहे. यामध्ये 8 तोळ्याचे मंगळसूत्र,4 तोळ्याचा हार,13 ग्रॅमची चैन, 2.5 ग्रॅमचे अंगठी, 4 ग्रॅमचे कानामधील कुंडी व एक नथ  चा समावेश आहे. नेमका हा चोर कोण होता कधी घरात आला आणि कधी सोने घेऊन गेला हे सावंत यांना समजले नाही त्यानी सोन्याची एक नवीन वस्तू केली होती ती त्या सोन्या सोबत ठेवण्यासाठी गेले असता ते सोने तिथे बेडमध्ये नसल्याचे त्यांना दिसले त्यावेळी त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे समजले. त्यादरम्यान त्यांनी कणकवली पोलिसांना धाव घेतली. यावेळी पोलिसांनी आजूबाजूला राहणाऱ्या काही जणांना चौकशीसाठी बोलावले होते.

कणकवली शहरात गेले तीन दिवस चोरीच्या घटना घडत आहेत. आणि त्यात ही चौथी चोरीची घटना आज उघडकीस आली आहे. त्यामुळे कणकवली शहरात वारंवार होणाऱ्या चोरीचा उलगडा पोलिसांनी लावण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.