चालत्या बसमध्ये तरूणीने त्याचा हात पकडला | नको ते कृत्य करण्याचा त्याचा डाव फसला

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 21, 2023 19:21 PM
views 163  views

वैभववाडी : खाजगी आराम बसमध्ये प्रवास करणाऱ्या तरुणीचा चालत्या बसमध्ये सहप्रवाशाने विनयभंग केला. याप्रकरणी आरोपी संदेश विठ्ठल पवार वय ३५ रा. शिरोडा वेंगुर्ला याच्यावर गगनबावडा पोलिस ठाणेत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अधिक तपासासाठी शून्य नंबरने  हा गुन्हा वैभववाडी पोलिस ठाणेत पाठविण्यात आला आहे. ही घटना  १९ जून २०२३  रोजी  राञी १ वाजण्याच्या सुमारास बस वैभववाडी हृदीत कोकिसरे फाटक दरम्यान आली असता घडला.

फिर्यादी तरुणी (ता १८ जून) मडगाव येथून दिनांक १८ जून रोजी राञौ ८.३० वा. पुणे काञज येथे जाण्यासाठी खाजगी आश्रय ट्रव्हर्ल्स बस क्र.एमएच ०९ इएम ७९१५ या स्लीपर बसमधून सीट नं.६ लोअरवरुन प्रवास करीत होती. ती राञौ झोपेत असताना बस वैभववाडी हृदीत रेल्वे फाटक दरम्यान आल्यानंतर तिला कोणीतरी स्पर्श करीत असल्याचे जाणिव झाली. तीने उठून आरोपीचा हात पकडून जोरदार आरडाओरडा केला. यावेळी बसमधील सहप्रवाशी जागे झाले. तिच्या सीटच्या विरुध्द सीट नं. १३, १४ वर बसलेला अनोळखी तरुण तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत होता.

तिने घडलेला प्रकार ड्रायव्हर कॕबिनमध्ये येऊन ड्रायव्हरला सांगितला. दरम्यान बस गगबावड्याला पोहचली होती. तिने बस चालकाला बस पोलिस ठाणेत घेऊन जाण्यास सांगितले. गगबावडा पोलिस ठाणेत तिने आरोपी संदेश पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.त्यानुसार भादवी कलम ३५४ अ अन्ववे त्याच्यावर गगनबावडा पोलिस ठाणेत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर गुन्हा वैभववाडी पोलिस ठाणेच्या हृदीत घडल्यामुळे गगनबावडा पोलिस ठाणेतून शून्य नंबरने हा गुन्हा अधिक तपासासाठी वैभववाडी पोलिस ठाणेत पाठविण्यात आला आहे.