तिलारीच्या 'त्या' कालव्याचं काम युद्धपातळीवर सुरु

गोव्याचा पाणी पुरवठा चार दिवसात सुरु होणार
Edited by:
Published on: January 28, 2025 16:42 PM
views 358  views

दोडामार्ग : तिलारी प्रकल्पाच्या गोव्याला जाणारा  डावा कालवा कुडासे धनगरवाडी येथे चार दिवसांपूर्वी फुटला होता. त्या कालव्याचे काम स्थानिक ठेकेदार व गोव्यातील पाटबंधारे प्रकल्पाचे अधिकारी युद्ध पातळीवर काम करत आहेत. येत्या चार दिवसात म्हणजे रविवार पर्यंत काम पूर्ण होऊन गोव्याला होणारा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे उपअभियंता अनिल मोहिते यांनी सांगितले. त्यामुळे बंद झालेला गोव्याचा पाणी पुरवठा चार दिवसात सुरु होणार आहे.

धनगरवाडी येथे शुक्रवारी सकाळी ६ वा.च्या  तिलारी प्रकल्पाचा डावा कालवा फुटला. त्यामुळे कालव्याचे पाणी बंद केले गेले. याचा विपरित परिणाम या कालव्यालगत असलेल्या शेती, बागायतींवर झाला. शिवाय गोवा राज्याला होणारा पाणीपुरवठादेखील बंद करण्यात आला आहे. गोव्यातील नागरिकांचे पाण्याअभावी हाल होऊ नये तसेच पर्यटनावर देखील विपरीत परिणाम होऊ नये यासाठी गोवा सरकारने आपल्या पद्धतीने हालचाली करण्यास सुरवात केली आहे. आज मंगळवारी कुडासे येथे फुटलेल्या लव्याच्या कामा संदर्भात वृतांकनासाठी गेलो असता सदरील काम हे युद्ध पातळीवर सुरु असल्याचे निदर्शनास आले. यावेळी स्थानिक ठेकेदार व उपभियंता तसेच गोवा राज्यचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रमोद बदामी, उपाभियंता आनंद पंचवाडकर आदी घटना स्थळी प्रत्यक्ष पणे काम करून घेत होते. 

पाण्याची निकड लक्षात घेता फुटलेल्या कालवा दुरुस्तीचे काम अतिशय युद्धपातळीवर सुरू झाले आहे. तेथे मोरी असल्याने मशीनच्या सहाय्याने प्रथमतः सर्व माती बाजूला करण्यात आली आहे. पाईप काढण्यात आले आहेत. नवीन सिमेंट  पाईप आणण्यात आले आहेत. माती काढून तेथे दगड व काँक्रिटीकरणाने भक्कम पाया केला जाणार आहे. त्याच्यावर सिमेंट पाईप बसवून, मातीचा भराव घालून, लायनिंग करून कालवा दुरुस्ती केला जाणार आहे. हे काम योग्य पद्धतीने केले जाणार असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता अनिल मोहिते यांनी दिली. यावेळी त्यांना या कामा संदर्भात विचारणा केली असता सदरील काम उद्धपातळीवर सुरु असून चार दिवसात काम पूर्ण होऊन रविवार पर्यत सुरु करण्यात येईल आई त्यांनी सांगितले.

कुडासेतील कामावर गोव्याचे लक्ष 

कुडासे धनगरवाडी येथे फुटलेल्या कालव्याच्या कामाला सुरवता केली आहे. काम व्यवस्तीत व योग्य पद्धतीने व्हावे यासाठी गोवा राज्याचे मंत्री सुभाश शिरोडकर यांच्या मार्गदर्शना खाली त्यांचे शिष्ट मंडळ काम करत आहे. पाट बांधारे प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रमोद बदामी तसेच सहाय्य्क अभियंता आनंद  पंचवाडकर हे प्रत्यक्ष घटना स्थळी थाण मांडून कामात लक्ष घालून काम जलद गतीने व्यवस्तीत करून घेत आहे. त्यामुळे लवकरच काम पूर्ण होऊन पाणी पुरवठा चार दिवसात सुरळीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.