कणकवली नगराध्यक्ष आणि त्यांच्या टीमचे काम कौतकास्पद – ना.नारायण राणे

कणकवलीच्या स्पोर्ट कॉम्प्लेक्सचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या हस्ते झाले लोकार्पण;कणकवलीत बारमाही वाहणाऱ्या धबधब्याच्या कामाचे भूमिपूजन
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 18, 2023 16:59 PM
views 274  views

कणकवली : कणकवली शहरात विविध नागरी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.जी आश्वासने गेल्या ५ वर्षांपूर्वी आम्ही दिली होती, ती आम्ही पूर्ण केली आहेत.शहरातील रस्ते आणि विविध विकासकामे गतीने सुरु आहेत.कणकवली शहरातील खेळाडूंसाठी स्पोर्ट कॉम्प्लेक्स हे एक चांगले दालन उपलब्ध झाले आहे.या ठिकाणी चांगल्या प्रकारे खेळाडू सराव करतील आणि घडतील. कणकवली शहरात अनेक राजकारणी आहेत. आता चांगले खेळाडूही घडतील. शहरात रस्ते आणि चांगल्या नागरी सुविधा आम्ही देत आहोत.कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि टीमचे काम कौतकास्पद आहे असे कौतुकोदगार केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री ना.नारायण राणे यांनी काढले.

कणकवलीच्या स्पोर्ट कॉम्प्लेक्सचे केद्रीय मंत्री नारायण राणेंच्या हस्ते पित कापून शनिवारी लोकार्पण करण्यात आले.तसेच कणकवलीत बारमाही वाहणाऱ्या धबधब्याच्या कामाचे भूमिपूजन ना.नारायण राणे,माजी खा.निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे ,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभिजीत मुसळे, अबिद नाईक,बाबू गायकवाड,अण्णा कोदे,दादा कुडतडकर,जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई,विराज भोसले,नगरसेविका मेघा गांगण, उर्वी जाधव,मेघा सावंत ,कविता राणे, अजय गांगण, किशोर राणे, महेश सावंत,संदीप नलावडे, अभय राणे,मुख्याधिकारी अवधूत तावडे, मेहुल धुमाळे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या क्रीडा संकुलनाचे काम उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल ना.राणे यांनी अमेय पारकर यांचे कौतुक केले तसेच हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी कणकवलीतील दर्जेदार काम करण्यासाठी प्रसिद्ध असलेले मिथील दळवी आणि राजू मुंनगेकर  यांनाही काम चांगले असल्याचे सांगितले. व  शहराच्या पर्यटनात भर टाकणारे व कणकवली वासियांना क्रीडा क्षेत्रात एक हक्काची जागा मिळवून देणारे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार करण्यात आले आहे. तसेच जानवली नदीवर गणपती साणा येथे बारमाही वाहणारा धबधबा तयार करण्यात येणार असून कणकवलीच्या पर्यटनात तो भर टाकेल. असेही राणे यांनी सांगितले

स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समुळे कणकवली शहरातील तरुणांना बॅडमिंटन, कबड्डी असे इनडोअर गेम खेळण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे.राज्यस्तरीय स्पर्धा होण्याच्या दृष्टीने हे स्पोर्ट कॉम्प्लेक्स तयार केले आहे. तर कणकवलीच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने बारमाही वाहणारा धबधबा गणपती साना या ठिकाणी केला जाणार असल्याचा आनंद असल्याचे ना.राणे यावेळी म्हणाले.

निलेश राणे व नितेश राणे यांच्याकडून बॅडमिंटन प्रदर्शन !

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे आणि त्यांचे बंधू आमदार नितेश राणे यांनी या नूतन स्पोर्ट कॉम्प्लेक्स मध्ये बॅडमिंटन खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले,यावेळी उपस्थित नागरिकांनी त्यांच्या खेळाला चांगली दाद दिली. मंत्री नारायण राणे यांनीही बडमिंटनचा आनंद लुटला