
वैभववाडी : वैभववाडी- सांगुळवाडी मार्गावर ऐन पावसाळ्यात खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे.सिंमेंट कॉक्रीटीने हे खड्डे बुजविले जात आहे.मात्र पावसाच्या अधूनमधून येणाऱ्या सरीमध्ये हे सिमेंट वाहून जात आहे.ऐन पावसाळ्यात सुरू असलेल्या या कामाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहरातून सांगुळवाडीकडे जाणारा मार्ग खड्डेमय झाला होता.या मार्गावरून प्रवास करणं धोकादायक बनला आहे.गेल्यावर्षीपासून या मार्गाची दुरावस्था झाली आहे.स्थानिक ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या नुतनीकरणाची वेळोवेळी मागणी केली होती.परंतू ती पुर्ण झाली नाही.अखेर आज या मार्गावर खड्डे बुजविण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले आहेत.प्रदीर्घ उन्हाळा संपल्यानंतर संबंधित विभागाला या मार्गाच्या दुरुस्तीबाबत जाग आली आहेत.ऐन पावसाळ्यात हे खड्डे सिमेंटने बुजविले जात आहेत.पावसाच्या सरींमुळे खड्यात टाकलेलं हे सिमेंट वाहून जात आहे.केवळ दिखाऊपणासाठीच संबंधित ठेकेदाराकडून काम केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.