कणकवली बस स्टॅन्ड वरील खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे..!

Edited by:
Published on: September 13, 2023 10:56 AM
views 201  views

कणकवली : कणकवली बस स्टॅन्ड वर पावसाळ्यात बरेच खड्डे पडले होते. त्यामुळे प्रवाशांना चिखलातून चालावे लागत होते. तसेच त्यांच्या अंगावर चिखल देखील उडत होता. म्हणून एसटी विभागाने खड्डे बुजवण्याचे  काम सुरू केले पण आठ दिवस खड्डे बुजून होत नाहीत तोपर्यंत पुन्हा त्या ठिकाणी भले मोठे खड्डे पडले असल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ऐन चतुर्थीच्या तोंडावर आता प्रवाशांना पुन्हा कणकवली बस स्टँडवर खड्ड्यांचा सामना करावा लागणार असल्याचे दिसत आहे.