
दोडामार्ग : देशाचा आदर्श नागरिक घडावा यासाठी जीवनात बाल वयातील संस्कार अत्यंत महत्वाचे असतात. असेच संस्कार देत उद्याची उज्वल भावी पिढी घडविण्यासाठी दोडामार्ग शहरातील दिशा प्री स्कुल अत्यंत महत्वाचं काम करत आहे. असे गौरदगार गोव्यातील नामवंत शिक्षक मिलिंद गणपुळे यांनी काढले.
दोडामार्ग येथील महाराजा सभागृहात दिशा एज्युकेशनल ट्रस्टच्या दिशा प्री-स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी त्यांचेसमवेत प्रमुख पाहुणे म्हणून दै. कोकणसादचे संपादक संदीप देसाई, शिक्षिका कविता गावस, शहरातील जनरल फिजिशियन डॉ. अमोल देसाई, संचालिका रीमा रत्नदीप राऊळ यांसह शिक्षिका प्रतीक्षा जाधव, पूर्वा नाईक, मयुरी गवस, संतोषी सादजी आदि उपस्थित होते.
यावेळी उपास्थित मान्यवरांचे हस्ते वर्षभरात प्लेग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सीनियर केजी मध्ये विविध कला, कौशल्य व बाल संस्कार उपक्रम आणि स्पर्धात यशस्वी चिमकुले विद्यार्थी यांचं मेडल व प्रशस्तीपत्र देऊन कौतुक करण्यात आल. यावेळी संदीप देसाई यांनी दिशा स्कुल खऱ्या अर्थाने आपल्या देशाचेभवितव्य म्हणून ज्यांचेकडे पाहिले पाहिजे अशा चिमुकल्याना संस्कार शिदोरी देण्याचं उत्तुंग काम करत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात शैक्षणिक साधनाचं व पर्यायायांचा गोंधळ असताना दिशा प्री स्कुल हे दोडामार्ग वासियांना आताचे हक्काचे केंद्र वाटू लागले आहे.
त्यामुळे दिशा एज्यूकेशन ट्रस्ट ने या भरारी अधिक वेगवान करावी असा संदेश दिला. गावस मॅडम यांनीही चिमीकल्यांचे उपस्थित माता पिता व नातेवाईक यांना महत्वाचे संदेश दिले. शाळा, घर आणि समाज या सहवासात आपली मुलं घडत असतात. यासाठी आपण सजग असले पाहिजे अशा त्या म्हणाल्या. डॉ. देसाई यांनीही शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक तथा संचालक राऊळ मॅडम यांनी प्री स्कुल ने वर्षभर राबविलेल्या उपक्रमाच वाचन करत पालक वर्गाच्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. यावेळी उपस्थित पालक वर्गानेही चिमुकल्यांच्या यशाबद्दल कौतुक करत. त्यांनी या निमित्ताने सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमानांही दाद दिली.