
सावंतवाडी : कोकणसादच्या हॉली जॉली ख्रिसमस विशेषांकाचं प्रकाशन शिक्षणमंत्री दीपक केसरकर व ख्रिस्ती धर्मगुरूंच्या हस्ते करण्यात आल. यावेळी हजारो ख्रिस्ती बांधव उपस्थित होते. कोकणसादनं केलेल्या या आकर्षक आणि माहितीपूर्ण विशेषांकाच ख्रिस्ती बांधवांनी कौतुक केले. याप्रसंगी मंत्री दीपक केसरकर यांनी ख्रिस्ती बांधवांना ख्रिसमसच्या व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
कोकणसाद प्रतिवर्षी नाताळच्या निमित्तानं विशेषांक आपल्या वाचकांच्या हाती देत असतं. यावर्षीच्या अंकाचं वैशिष्ठ म्हणजे हा विषेशांक संपुर्ण मराठी भाषेत आहे. यात ख्रिश्चन धर्मांची वाटचाल, विविध चर्चच्या उभारणीचा इतिहास, या माध्यमातुन चालवले जाणारे धार्मिक उपक्रम यांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील विविध चर्चचे फोटोही या अंकात आहेत. नाताळ सणाची पार्श्वभूमी, प्रभू येशूची शिकवण याबाबतचे विशेष लेख यात आहेत. या अत्यंत माहितीपूर्ण आणि संग्राहय विशेषांकाचं सर्वच ख्रिश्चन बांधवांनी उत्साहात स्वागत केलं. कोकणसादनं अत्यंत सुंदर अशा मांडणीत महत्वाच्या विषयांवरचे नामवंत लेखकांचे लेख दिल्याबददल संपुर्ण टीमचं कौतुक केलं.
याप्रसंगी फादर मिलेट डिसोजा, फादर अलेक्स, फादर विल्यम सालधाना, फादर रिचर्ड सालधाना, फादर कजितान फादर अमित डीब्रिटो, फादर रोहन, फादर सेड्रिक, फादर मेल्विन, फादर सुरेश, फादर लिजू, अनारोजीन लोबो, आगस्तीन फर्नांडिस, जेम्स बोर्जीस, यांसह हजारो ख्रिस्ती बांधव, कॅथॉलिक अर्बन बँकेचे संचालक उपस्थित होते.