ती महिला मद्यधुंद अवस्थेत

रुग्णालयात उपचार सुरु
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 14, 2023 14:19 PM
views 8305  views

कुडाळ : मालवण-कसाल मार्गावर रानबांबुळी एका घराशेजारी मद्यधुंद अवस्थेत २५ ते ३० वयोगटातील एक अज्ञात महिला पहाटेच्या सुमारास आढळून आली. याबाबत स्थानिक नागरिकांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस स्थानकाशी संपर्क साधत याची माहिती दिली.

 सिंधुदुर्गनगरी पोलीस व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय १०८ रुग्णवाहिका डॉ. विष्णू पवार घटनास्थळी दाखल होत या महिलेची वैद्यकीय तपासणी केली असता ती मद्यधुंद अवस्थेत आढळून आली. सद्यस्थितीत या महिलेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथे उपचार सुरू आहेत.

 ही अज्ञात महिला बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने तिची अद्याप वैद्यकीय तपासणी होऊ शकलेली नाही. तसेच ती मद्यधुंद असल्याने तिचे नाव गाव समजू शकलेले नाही. यामुळे पोलिसांच्या तपासात अडचणी निर्माण होत आहेत. तर महिला स्थानिकच असल्याची चर्चा ऐकायला मिळतेय.