
कणकवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ३० नोव्हेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसे लॉटरी सेनेमार्फत जवळपास 250 बॅनर जिल्ह्यात लावण्यात आले. मनसे लॉटरी सेनेचे तालुका अध्यक्ष अमित घाडी यांनी स्वतः रात्रभर जागून हे बॅनर लावले होते. त्याची नगरपंचायत जवळून रीतसर लेखी परवानगी घेऊन शुल्क भरले होते. पण काल ओरोस या ठिकाणी जात असताना कणकवलीच्या आसपास लावलेले बॅनर गायब दिसले. मनसेचे इंजिन हिंदुत्वाच्या ट्रॅकवर सुसाट असल्यामुळे बेगडी हिंदुत्ववाल्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे बॅनर काढण्यात आले. अशा विरोधकांना मनसे जशास तसे उत्तर देईल असे अमित घाडी यांनी सांगितले.