चिंदर बाजारात राहत्या घराची भिंत कोसळली

Edited by:
Published on: August 02, 2024 13:18 PM
views 174  views

मालवण  : सातत्याने कोसळणाऱ्या  पावसाचा फटका चिंदर बाजार येथील सुषमा सुरेंद्र बांदिवडेकर यांच्या राहत्या घराला बसला आहे. या घराची भिंत गुरुवारी सायंकाळी कोसळली. बांदिवडेकर यांच्या घरात पाच व्यक्ती वास्तव्यास आहेत, भिंत कोसळताना आवाज होऊ लागल्याने घरातील माणसांनी घराबाहेर धाव घेतल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनास्थळी चिंदर ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, ग्रामसेवक मंगेश साळसकर, पोलीस पाटील दिनेश पाताडे, समीर हडकर, आचरा पोलीस सुदेश तांबे आणि मनोज पुजारे दाखल होत पहाणी केली. तलाठी संतोष जाधव यांनी पाहणी करून नुकसाग्रस्त घराची पहाणी करून पंचायदी घातली.