घराची भिंत अचानक कोसळली ; महिला जखमी

Edited by: संदीप देसाई
Published on: July 22, 2023 20:45 PM
views 349  views

दोडामार्ग : कुडासे वानोशी येथील भगवान बमू वरक यांच्या घराची मागची पुर्ण भिंत  अचानक कोसळल्याने घरातील ६५ वर्षीय ठकी वरक या जखमी झाल्या आहेत. शिवाय या गरीब कुटुंबाचे पावसात घराची भिंत कोसल्याने सदर कुटुंब अडचणीत सापडले आहे.    शनिवारी सायंकाळी ८ च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

  धो धो कोसळणारा पाऊस आणि जोरात वाहणारा वारा यांमुळे वरक यांच्या घराची पाठीमागील आणि मधला भाग पुर्ण कोसळला. त्यात सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. ही घटना घडली तेंव्हा लहान मुले पाठीमागे वावरत होती. तर ठकी बमू वरक आंघोळीसाठी पाठीमागे गेले असता  अचानक भिंत कोसळली. तशा स्थितीत त्या मुलांना घेऊन आहे त्या  पुढच्या दरवाजाकडे पळाली. भगवान वरक कामावर गेले असताना घरात चार माणसे घरी होती. संध्याकाळी 8 वाजता हा प्रकार घडला. अत्यंत भयावह आणि गंभीर प्रकार असुन ठकी बमु वरक यांना कमरेला, पाठीला, पायाला मार बसला असून त्या जखमी झाल्या  आहेत.