सर्वांना सोबत घेऊन देवबाग गावच्या गतिशील विकासाचे व्हिजन !

सरपंच पदाचे उच्चशिक्षित उमेदवार रामचंद्र चोपडेकर व सर्व सदस्यांना ग्रामस्थांचा वाढता पाठिंबा
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: December 17, 2022 17:08 PM
views 198  views

मालवण : सर्वाना सोबत घेऊन देवबाग गावच्या गतिशील विकासासाठी मोठे व्हिजन घेऊन गावची ग्रामपंचायत निवडणूक लढवत असलेले, भाजप पुरस्कृत सरपंच पदाचे तरुण, तडफदार, हुशार, अभ्यासू, असे उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्व रामचंद्र चोपडेकर यांना गावात सर्वत्र पाठिंबा वाढत आहे. ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता रामचंद्र चोपडेकर व सदस्य उमेदवार हे बहुमताने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 


रामचंद्र चोपडेकर यांच्या आवाहन पत्रातून गावाप्रति असलेले त्यांचे प्रेम तसेच व्यापक व शाश्वत दृष्टकोन स्पष्ट होतो. ग्रामस्थ, मच्छिमार, पर्यटन व्यावसायिक या सर्वांचा सर्वांगीण विकास हे दुरदृष्टी व्हिजनच्या माध्यमातून स्पष्ट होते. 



एकूणच सरपंच पदाचे उमेदवार रामचंद्र चोपडेकर व सदस्य पदाचे सर्व उमेदवार सदस्य पदाचे उमेदवार वार्ड १ हेमंत रोहिदास बांदेकर, सिया रामचंद्र चोपडेकर, 

स्वरा गुंडू तांडेल, वार्ड २ स्वप्नील सिताकांत साळगांवकर, गार्गी गणेश मोंडकर, वार्ड ३ अपर्णा अरविंद धुरी, घन:श्याम (तात्या) लक्ष्मण बिलये, रेश्मा शंकर मांजरेकर यांना मिळणारा प्रतिसाद पाहता. मोठ्या मताधिक्याने भाजप पुरस्कृत सर्व उमेदवार विजयी होतील. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून देवबाग गावच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत निवसणुकीत भाजप उमेदवारांचा विजय महत्वपूर्ण ठरेल. त्यामुळे जनता भाजप पुरस्कृत सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करेल. असा विश्वास व्यक्त होत आहे.