
मालवण : ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वायरी भूतनाथ जिल्हा परिषद मतदार संघातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. गाव देईल तोच उमेदवार निश्चित करणार असल्याचे अशोक सावंत, धोंडी चिंदरकर यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, अशोक तोडणकर, रमेश हडकर, दाजी सावजी, मंदार लुडबे, भाई मांजरेकर, विरेश मांजरेकर, मोहन कुबल, मुन्ना झाड, विकी लोकेगावकर, पांडुरंग मायनक, कुणाल नाईक, जीवन नाईक, विजय केळूसकर आदी उपस्थित होते.
वायरी भुथनाथ जिल्हा परिषद मतदार संघात येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत निहाय गावात जाऊन बैठका घेण्यात आल्या. गावचा सरपंच आणि सदस्य उमेदवार हे गावातील ग्रामस्थ जो उमेदवार देतील तोच निश्चित करण्यात येत असल्याचे सावंत आणि चिंदरकर यांनी सांगितले.