कलमठच्या विकासासाठी ‘एआय’चा वापर कौतुकास्पद

निती आयोगाचे सदस्य डॉ. देवव्रत त्यागी यांचे कौतुकोद्गार निती आयोगाच्या शिष्टमंडळाची कलमठ ग्रा. पं. ला भेट
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: October 31, 2025 18:03 PM
views 67  views

कणकवली : एआय प्रणालीचा प्रभावीवापर करून कलमठ ग्रामपंचायत गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. कलमठचे एआय रोल मॉडेल माहिती निती आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकारला देऊन हे मॉडेल देशातील प्रत्येक गावात राबविण्याबाबत शिफारस करू, अशी आश्वासन निती आयोगाचे सदस्य डॉ. देवव्रत त्यागी यांनी दिले. दरम्यान, निती आयोगाच्या सदस्यांसमोर एआयद्वारे कलमठ ग्रा.पं.द्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे प्रेझेंटशन करण्यात आले. या उपक्रमांबद्दल निती आयोगाच्या सदस्यांनी सरपंच, ग्रा.पं.सदस्य यांच्यासह ग्रामस्थांचे कौतुक केले. भेट दौरा कार्यक्रमासाठी सदस्यांना उशिर झाल्याबद्दल डॉ. त्यागी यांनी दिलीगिरी व्यक्त केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या एआय सिंधुदुर्ग मॉडेलाचा देशपातळीवर विस्तार करण्याच्यादृष्टीने निती आयोगाचे शिष्टमंडळ दोन दिवस सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहे. या शिष्टमंडळाने गुरुवारी रात्री कलमठ ग्रा. पं. कार्यालयास भेट दिली. निती आयोगाचे सदस्य डॉ. देवव्रत त्यागी, डॉ. विदिशा दास, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा इंगवले-काळगे, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच दिनेश गोठणकर आदी उपस्थित होते.  

निती आयोगाचे शिष्टमंडळ कलमठ ग्रा. पं. कार्यालयात दाखल झाल्यानंतर सरपंच संदीप मेस्त्री यांनी त्यांचे स्वागत केले. कलमठ ग्रा. पं.तीद्वारे कार्यालयीन कामकाज, स्वच्छता विषयक उपक्रम, आरोग्य विषयक उपक्रम, शैक्षणिक उपक्रम, अंगणवाडी सेविकांच्या कामकाजात एआय प्रणालीचा कशाप्रकारे वापर केला जात याचे स्क्रीनद्वारे प्रेझेंटेशन सदस्यांसमोर करण्यात आले. हे प्रेझेंटेशन करणाºयांनी एआयचा वापर केल्यानंतर बदल आणि फायदे काय झाले, याचे अनुभव शेअर केले. कलमठ गावात राबविण्यात आलेल्या एआय प्रणालीचा डॉ. त्यागी यांनी माहिती जाणून घेतली. कलमठ गावाच्या विकासासाठी ग्रा. पं. प्रशासन, सरपंच, ग्रा.पं.सदस्य, शासकीय विभागांचे ग्रा.पं.स्तरावरील अधिकारी व  कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने एआय तंत्रज्ञानाचा कशापद्धतीने वापर केला जात आहे, याची सविस्तर माहिती त्यागी यांनी जाणून घेतली. गावाच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. कलमठचे एआय रोल मॉडेल माहिती निती आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकारला देऊन हे मॉडेल देशातील प्रत्येक गावात राबविण्याबाबत शिफारस करू, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी उपसरपंच दिनेश गोठनकर, ग्रा.पं.सदस्य पप्पू यादव,स्वप्नील चिंदरकर ,महेश महेश लाड, डॉ रुपाली वळंजू, नितीन पवार, सचिन खोचरे, अनुप वारंग, सुप्रिया मेस्त्री,स्वाती नारकर ,जराणा शेख, सुविधा सावंत, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर ,शिक्षण विस्तार अधिकारी प्रेरणा मांजरेकर,श्रेयस चिंदरकर,धीरज मेस्त्री, शिक्षक  रश्मी आंगणे,प्रमोद पवार, आनंद तांबे, अमित हर्णे ,रमेश डोईफोडे, मधुरा सावंत, ,विद्या लोकरे, यांच्यासह जि. प. चे शिक्षक, शिक्षिका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रा. पं. कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.