सातत्यपूर्ण कार्यक्रम केल्याने चर्मकार समाजाची एकजूट कायम | आ. वैभव नाईक यांचे गौरवोद्गार

चर्मकार समाज उन्नती मंडळाचा गुणगौरव व समाजभूषण वितरण सोहळा संपन्न
Edited by: देवयानी वरसकर
Published on: August 02, 2023 13:03 PM
views 174  views

सिंधुदुर्ग : सिंधदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सातत्यपूर्ण आपल्या समाजातील गुणवंतांचा सन्मान करत आले आहे.तसेच विविधांगी उपक्रम हे मंडळ राबविते.त्यामुळे समाज जागृती होऊन समाज एकसंध राहण्यास मदत होत असून,समाजाची एकजूट राहण्यास मदत होते.यावेळी मंडळाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या संत रविदास भवनास आणखी निधी देण्याची घोषणा आमदार नाईक यांनी केली.

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ च्या वतीने समाजातील विविध परिक्षात यशस्वी झालेले विदयार्थी सत्कार,समाजातील गुणवंत व्यक्ती सत्कार व समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सत्कार कार्यक्रम ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे प्राथमिक शिक्षक पतपेढीत रविवारी पार पडला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार वैभव नाईक उपस्थित होते.जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक विजय चव्हाण,ऍड.अनिल निरवडेकर,जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव,उपाध्यक्ष सुरेश पवार,सुधाकर माणगावकर,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे दिलीप कानडे, समाजसेवक गणेश जाधव,संजय चव्हाण,रविकिशोर चव्हाण,प्रदीप पवार,माजी अध्यक्ष प्रकाश चव्हाण,नंदन वेंगुर्लेकर,के.टी. चव्हाण,श्रीराम चव्हाण,राजन वालावलकर,तालुकाध्यक्ष सर्वश्री गणेश म्हापणकर, मनोहर सरमळकर,हरेश चव्हाण,महानंद चव्हाण,रमेश चव्हाण,सहदेव शिरोडकर,बाबनी केरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी समाजातील प्रत्येक तालुक्यातून प्रथम तीन आलेल्या इ.दहावी ,बारावी,पदवीधर तसेच सर्व शिष्यवृत्ती धारक,नवोदय विद्यालय निवड,विशेष परीक्षा उत्तीर्ण, प्राविण्य मिळविणारे विदयार्थी तसेच विविध पुरस्कारप्राप्त व संस्था अगर शासकीय समित्यांवर निवड झालेल्या समाज बांधवांचा सन्मान यावेळी करण्यात आला.तसेच संत रविदास समाज भूषण पुरस्कार कुडाळ मधून सुरेश पवार,मधुकर चव्हाण यांना,सावंतवाडीतून बाबुराव चव्हाण, सदानंद चव्हाण, मालवण मधून विजय पाताडे,मुरारी जांभळे,कणकवली मधून अनिल चव्हाण,दत्ताराम जाधव,देवगड मधून प्रभाकर दहिबांवकर,वेंगुर्ला मधून सहदेव शिरोडकर,नामदेव चव्हाण,दोडामार्ग मधून नारायण पार्सेकर,नरेश पार्सेकर यांना तर जिल्हा विशेष समाजभूषण पुरस्कार गणेश जाधव,दिलीप कानडे, संजय चव्हाण,योगिता आंदुर्लेकर,कांता कोडल्याळ,सुनील नारकर यांना प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक  सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी सूत्रसंचालन बाळकृष्ण नांदोसकर यांनी केले.कार्यक्रमास बहुसंख्येने समाजबांधव उपस्थित होते.