
कणकवली : कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. विरोधकांची जेवढ्या जोरात टीका सुरू आहे, त्या पेक्षा जास्तपटीने भाजपामध्ये इनकमिंग देखील सुरू आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला एकसारखे धक्के मिळत आहेत. यावेळी सुनील भगवान सावंत, समीक्षा सावंत, प्रवीण सावंत प्रणिता सावंत राजे सावंत, साक्षी सावंत, निर्मला सावंत, भिकाजी सावंत, विना सावंत, सुरेखा सावंत, प्रकाश सावंत, पुष्पांजली सावंत, छाया सावंत, रोहिणी धटने, सुनील सावंत चंद्रकांत सावंत सुनंदा सावंत मोहन सावंत, मनीषा सावंत शोभा सावंत रुपेश सावंत, पुष्पा सतीश सावंत, विलास सावंत पल्लवी सावंत प्रशांत सावंत प्रकाश मराठे प्रतीक्षा मराठी हर्षद मराठी सिद्धेश सावंत,शुभांगी सावंत,सुरेश सावंत श्रेया सावंत, सतीश शंकर सावंत, पूजा राणे, बाबाजी राणे,रंजना सावंत, जनार्दन सावंत, डिसोजा, निलेश जाधव ,नीलिमा जाधव, गणपत राणे, विजया राणे, तनिष सावंत, शारदा सावंत,यांनी प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी स्वागत केले. विकासकामांच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
यावेळी उपस्थित आमदार नितेश राणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.