शिवीगाळ व मारहाण प्रकरणातील दोघे निर्दोष | संशयितांतर्फे अॅड. हेमेंद्र गोवेकर यांनी पाहिले काम

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: August 07, 2023 13:28 PM
views 403  views

मालवण : मालवण कुंभारमाठ येथील दिनेश दत्ताराम साळकर (वय ३९) यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी एडी अंतोन फर्नांडिस व त्याचा मॅनेजर आल्मेडा या दोघांची मालवणचे न्यायाधीश देवकाते यांनी निर्दोष मुक्तता केली.

संशयितांतर्फे अॅड. हेमेंद्र गोवेकर यांनी काम पाहिले. मालवण कुंभारमाठ येथील दिनेश साळकर हे आपल्या मुलाला घरी बोलविण्यासाठी दि. १२ सप्टेंबर २०२१ रोजी एडी फर्नांडिस यांच्या धुरीवाडा येथील फिश 'विक्रीच्या दुकानात गेले असताना ही मारहाण झाली होती.